अशा वेळी देव कामा येत नसतील तर तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा तेवढंच देवाला पुण्य... देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना ...