Skip to main content

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर
तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा
तेवढंच देवाला पुण्य...
    देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना स्वतःच भविष्य माहीत नाही ते दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार..ज्याचा स्वतःच्या मनगटावर विश्वास नाही ते असले फालतु उद्योग करतात. तुमचा विश्वास असुद्या पण अंधविश्वास नसुद्या...  तसे पण आता देवाचे, देवाच्या नावावर फसवून पैसे उकळणार्या बुवा-बाबाचे दिवस संपले आहेत किंबहुना ते संपत आले आहेत. देवा काहीतरी कर तुझं अस्तित्व धोक्यात आहेत. तु काहीच करू शकत नाहीस याच्यावर माझा विश्वास आहे..मला कुणाच्याच मनातल्या श्रध्दा/भावना दुखवायच्या नाहीत... हे माझं व्यक्तीत मत आहे....
      तुम्हाला देव भेटला तर मलाही सांगा? माणसाला देव मानू नका किंवा देवाच्या रूपानं माणूस धावून आला असंही म्हणू नका. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत तर माणसा सारखंच वागा.त्यामुळे माणसाला देव बनण्याचा किंवा देव बनविण्याचा प्रयत्न करून नका.माणुसकीचा धर्म पाळा...
     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गीत खूप सुंदर आहे. माणसाने कसं वागलं पाहिजे ते ह्या गीतात सांगितले आहे.किंवा माणूस कसा असला पाहिजे हे या गीतात सांगितले आहे. मंगेश पाडगावकर यांनी हे गीत लिहले आहे.
      ज्ञान बनो कर्मशील , कर्म ज्ञानवान
   
      पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान
      ज्ञान बनो कर्मशील , कर्म ज्ञानवान.
      जातीभेद ,वंशभेद , धर्मभेद दूर
      लाख लाख कंठातून हाच एक सूर
      करुणेच्या चरणांशी नत हो विज्ञान.
      माणुसकी धर्माचा अंत जाणतो
      श्रम निष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो
      हृदयातून समतेचा निर्भय अभिमान.
       सेवेतेच मुक्ती ही मंगल दीक्षा
       न्यायास्तव जागृतीही सत्व परीक्षा
       हे विश्वची घर अमुचे मंत्र हा महान.
            - मंगेश पाडगावकर
         
  चला आता माणूस बनू यात. दान पेट्या भरून आपली आमदनी वाढणार नाही ती कमी होणार आहे...हे गीत ऑडिओ स्वरूपात एकदा ऐका...नक्कीच देव सापडले(माणसात)
         

वैभव चौधरी

Comments

Popular posts from this blog

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...