आमची लालपरी. रोजचाच वैताग असायचा हिचा. आम्ही गावात स्टँडवर सकाळी ६:३० वाजल्यापासून उभे असायचो हिची वाट पहात. कधीच वेळेवर येत नसायची. ८ वाजले तरी आम्ही गावातच असायचो. पण एस टी काय येत नसायची आणि आली तरी तिच्यात जागा नसायची. लय वैताग यायचा. त्यात भर म्हणजे एसटीत बसलेले प्रवासी सुद्धा कधी जागा मिळावी म्हणून आम्हाला मदत करायचे नाही. शिरूरला कॉलेजला येणारी खुप मुलं असायची. आलेगाव, आंधळगाव फाटा, न्हावरे ,आंबळे आणि करडे या चार-पाच गावातील पोरं-पोरी कॉलेजला यायची . ह्या सगळ्यांच्यात आम्हाला न्हावऱ्याच्या (न्हावरे) पोरांचा लय राग यायचा. बस येतानी शेवटचं गाव आमचं असायचं म्हणून बस अगोदर फुल असायची. त्यामुळे ती डायरेक्ट आमच्या गावात म्हणजे करड्यात न थांबताच निघून जायची. आणि जरी थांबली तरी बस मध्ये असलेली अगोदरच्या गावातील पोरं सहकार्य करायचे नाहीत. आमचं भांडणच व्हायचं कधी कधी. थोडं सुद्धा ते ऍडजस्ट करत नसायचे त्यांच्यावर अक्षरशा ओरडावं लागायचं तेव्हा ते कुठे ऍडजस्ट करायचे. म्हणजे सगळीच पोरं तशी न्हवती.म्हणजे त्यांना तरी कुठं बसा...