Skip to main content

लालपरीची आठवण😍

आमची लालपरी.
रोजचाच वैताग असायचा हिचा. आम्ही गावात स्टँडवर सकाळी ६:३० वाजल्यापासून उभे असायचो हिची वाट पहात. कधीच वेळेवर येत नसायची. ८ वाजले तरी आम्ही गावातच असायचो. पण एस टी काय येत नसायची आणि आली तरी तिच्यात जागा नसायची. लय वैताग यायचा. त्यात  भर म्हणजे एसटीत बसलेले प्रवासी सुद्धा कधी जागा मिळावी म्हणून आम्हाला मदत करायचे नाही.
                 शिरूरला कॉलेजला येणारी खुप मुलं असायची. आलेगाव, आंधळगाव फाटा, न्हावरे ,आंबळे आणि करडे या चार-पाच गावातील पोरं-पोरी कॉलेजला यायची . ह्या सगळ्यांच्यात आम्हाला न्हावऱ्याच्या (न्हावरे) पोरांचा लय राग यायचा. बस येतानी शेवटचं गाव आमचं असायचं म्हणून बस अगोदर फुल असायची. त्यामुळे ती डायरेक्ट आमच्या गावात म्हणजे करड्यात न थांबताच निघून जायची. आणि जरी थांबली तरी बस मध्ये असलेली अगोदरच्या गावातील पोरं सहकार्य करायचे नाहीत. आमचं भांडणच व्हायचं कधी कधी. थोडं सुद्धा ते ऍडजस्ट करत नसायचे त्यांच्यावर अक्षरशा ओरडावं लागायचं तेव्हा ते कुठे ऍडजस्ट करायचे. म्हणजे सगळीच पोरं तशी न्हवती.म्हणजे त्यांना तरी कुठं बसायला जागा असायची. ती पोरं पण एसटीत ऊभीच असायची. बस मध्ये जागा नसल्यामुळे दोन सिटांच्या मध्ये जी जागा असते तिथे मधी उभे राहून जावा लागायचं. त्यांचा का राग यायचा याचं कारण म्हणजे आमच्या गावातील १००/१२५ जण गावात स्टँडवर असायचे. त्यांनी थोडं सहकार्य केलं की आमच्या गावातील १०-२० काय जातील तेवढी जण त्यात बसून गेली असती. म्हणजे सगळ्यांनीच थांबण्यापेक्षा ज्यांना जस बस मधी बसवता येईल तसं आम्ही बसवायचा प्रयत्न करत होतो. आणि ती मुलं कधी सहकार्य करायची नाही. म्हणजे त्यांना ही काहीतरी मजबुरी असेल. (बस मध्ये खूप काही घडत असायचं. कुणी कुणासाठी तरी कुठंतरी विशिष्ट ठिकाणी उभं असायचं. किंवा कुणाला तरी एका विशिष्ट ठिकाणीच उभं राहिल्यावर विशिष्ट व्यक्ती दिसायचा😜.म्हणून सुद्धा ती मुलं आम्हाला सहकार्य करत नसतील.आणि त्यांच्या दृष्टीने पण ते योग्यच होतं. आम्हाला वाटायचं त्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात म्हणून आम्ही तळतळ करायचो. पण त्यांना वाटत असेल या पोरांना जर बस मध्ये घेतलं तर त्या विशिष्ट व्यक्ती पासून आपण लांब जाऊ किंवा तो आपल्याला दिसणार नाही😛😜. अशा त्यांच्या वयक्तिक भावना असतील😜. आयुष्याला दिशा फक्त वर्गात बसल्यानेच थोडी मिळते ती दिशा कधी कधी अशी बसमध्ये सुद्धा मिळू शकते😉. कुणीतरी कुणाला मिळवण्यासाठी सुद्धा ध्येय प्राप्त करण्यासाठी ध्येयाच्या पाठीमागे हात धुवून लागतो. अशी कित्तेक विद्यार्थी असतील त्यांच्या आयुष्यात या बसमुळे बदल घडला असेल. असो विषयांतर नको😜🤓)
आम्हाला वाटायचं आमची दहावीस जण कमी झाली की बाकीच्यांना मागच्या बसमध्ये जागा मिळेल म्हणजे जेणेकरून कोणी माग राहायला नको.बस मध्ये सिटवर बसून जायचं भाग्य आम्हा करडेकरांना कधिकधीच मिळायचं. कधीकधी म्हणजे न्हावऱ्यातली मुलं त्यांच्या बस स्टँडवर येण्याअगोदर त्यांच्या गावातून बस निघून आली तर... नाहीतर नाही..आणि त्यात एसटी ची कायमची भळभळ कधीच वेळेवर नाही. आमच्या रूटला विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे आम्ही खूप वेळा डेपोवाल्यांना सांगितले की आम्हाला ज्यादा बस द्या.  पण ते काही ऐकत नसायचे.
                      आमचं कॉलेज ७:४५ चालू व्हायचं. आम्ही ६:३० गावात येऊन थांबायचो. ८/९ वाजले तरी गावातच असायचो. त्यामुळे बस आडवा, आंदोलन करा , गावातून सरपंचाच पत्र लिहून द्या. वगैरे वगैरे असंच चालायचं.मी ही शिरूर तालुका विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे खूप खटपट करायचो.आमची ही संघटना अ-राजकीय होती. [ आपण समाजासाठी-विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं या विचाराने ही संघटना माझ्या सोलापूरच्या मित्राने स्थापन केली होती. त्याने सोलापूरला या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. आम्ही एकाच विचाराचे होतो, आम्ही ११वी १२वीला एकत्रच होतो. त्याने मला त्याच्या संघटनेत शामिल करून घेतलं होतं म्हणून हे पद माझ्याकडे होतं ]   तरीपण काही फायदा होत नसायचा. चार पाच दिवस सगळं सुरळीत चालायचं की परत जैसे थे. आमच्या शिरूर डेपोला लय लोकं शिव्या द्यायचे. अख्या तालुक्याचा विकास झाला पण आमच्या शिरूर बस डेपोचा काही झाला नाही. कुठलंच नीट नियोजन नसायचं. कधी कधी एसटीमध्ये जागा असली तरी ड्रॉइव्हर गाडी थांबवत नसायचा. परत आम्ही एसटी अडवली की आमच्याच नावानी बोंबलायचे. करड्यातली पोरं एसटी अडवत्यात ,कायम वैताग देतात म्हणून आम्ही गाडी थांबवत नाही. आम्हाला तरी काय हौस असायची का? आम्ही आठ नऊ वाजेपर्यंत ताटकळत थांबायचो. तरी त्याचं कुणाल काही देणं घेणं नसायचं. म्हणून हा एवढा सगळा प्रपंच करावा लागायचा. एसटी डेपोला निवेदन देऊन देऊन वैतागलो आम्ही. पण आम्हाला एस टी काही कधी वेळेवर आली नाही. जस जमेल तसं कॉलेजला जायचो. तेव्हा खूप वैताग यायचा, चीड यायची या व्यवस्थे विरुद्ध आणि मग याचा राग म्हणून कधी कधी शरद पवारांच्या नावानी ओरडायचो. नाहीतर अजित पवारांच्या.त्यावेळेस लय राग यायचा यांचा यांनी बारामतीचे एस टी स्टँड किती भारी बनवलंय. असं स्टँड सगळ्या महाराष्ट्रात बनवलं असतं तर काय रोग आला असता यांना. काय आहे त्या बारामतीत. शिरूरला बारामती सारख्या मोठ्या बस डेपो ची गरज आहे. शिरूर मधली लोकसंख्या पाहता, इथली औद्योगिक वसाहत पाहता, आशिया खंडांतील सगळ्यात मोठी औद्योगिक वसाहत शिरूर तालुक्यात आहे.
रांजणगावाला आख्या देशातून लोकं येतात मग त्यांच्यासाठी इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थित नको का करायला. इथल्या प्रॉपर लोकांच्यासाठी ही व्यवस्था नको व्यस्थित करायला. आणि त्या शिरूरच्या स्टँडची जागा पण अशा ठिकाणी की ज्यामुळे अक्खा शिरूरचा मेन एरिया ब्लॉक व्हायचा.  त्यावेळेस खूप कल्पना सुचायच्या ही व्यवस्था सुरळीत व व्यवस्थित करण्यासाठी काय काय केलं पाहिजे. शिरूरला कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काय काय केलं पाहिजे. अस सगळं काही काही सुचायचं पण त्याचा काही उपयोग नसायचा. कारण आपल्या हातात काही नसायचं. असं वाटायचं की ही निर्णय प्रक्रिया जर आपल्या हातात असती तर मी खूप व्यस्थित केलं असतं हे सगळं. असलं काय काय डोक्यात चालायचं माझ्या. पण काय करणार! असो! चालायचं हे!

अशीच एक दिवस बस अडवली होती तेव्हाचा हा फोटो आहे. आज जुने फोटो चाळत असताना सापडले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या लॉक डाऊन मुळे मन सारखंच भूतकाळात जात आहे. या जुन्या दिवसांना खूप मिस करतोय. मिस यु मित्रानो. खूप किस्से आहेत जसं आठवल तसं लिहिल!

तुमचा मित्र
 वैभव चौधरी


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा तेवढंच देवाला पुण्य...     देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...