शहरातील शिकलेल्या माणसापेक्षा जंगलात राहणार आदिवासी माणूस जास्त सुसंस्कृत ,प्रगल्भ आणि समजूतदार आहे- वैभव चौधरी
शहरातील शिकलेल्या माणसापेक्षा जंगलात राहणार आदिवासी माणूस जास्त सुसंस्कृत ,प्रगल्भ आणि समजूतदार आहे- वैभव चौधरी वाईज अँड अदरवाईज हे सुधा मूर्ती यांचं पुस्तक वाचत होतो.या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या अनुभवांचं कथन आहे. या अनुभवकथनातील प्रत्येक लेख हा विचार करायला लावणारा आहे. याच पुस्तकातील ६ वा लेख आहे म्हताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा. या लेखातील काही भाग मी इथे आपणाला वाचण्यासाठी देत आहे.या लेखात सुधा मूर्ती आणि त्या म्हताऱ्या माणसांमध्ये झालेला सवांद अंतर्मुख करणारा आहे. विचार मग्न करायला लावणारा आहे.ज्या प्रकारे त्या माणसाच्या बोलण्यानं सुधा मूर्ती विचार मग्न झाल्या त्याच प्रकारे वाचक ही विचार मग्न होतो. सुधा मूर्ती ह्या ओडीसा राज्यातील आदिवासी भागातील एका खेड्यात भेट द्यायला जातात तेव्हा त्यांची त्या गावातील एका म्हाताऱ्याशी भेट होते. त्यांच्यात झालेल्या संवादातून असं कळतं कि भारत देश स्वतंत्र झाला आहे हे भार...