Skip to main content

देवावर रुसा रे कधीतरी !!

देवावर रुसा रे कधीतरी !!
 देवावर रागवा रे कधीतरी !!
 देवावर ओरडा रे कधीतरी !!
तो येतो का कधी धावून आपल्या
मदतीला.
एखाद्या मित्राने आपली मदत नाही केली
कि त्याच्यावर रुसून ,रागावून,
त्याला वाकडं-तिकडं बोलून
पार शिव्या देऊन मोकळं होणारे आपण.
देवावर रागावतो का कधी ? देवावर रुसतो का कधी ? देतो का कधी शिव्या देवाला?.
आपण मित्रांसोबत फक्त एवढंच करत नाही. आपण त्यांच्या बरोबर बोलायचं पण सोडतो.
पण आपण देवा बरोबर असं वागतो का कधी!
आपण देवाला शिव्या देतो का कधी !
तो तर कधीच आपल्या मदतीला धावून येत नाही,
तो आपल्याला कधी भेटायला सुद्धा येत नाही.
आपणच जातो झकमारुन त्याला भेटायला त्याच्या दारात!
म्हणजे बघा ना किती एटिट्यूड आहे देवाला.
इथं आपण आपल्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने आपल्याला एटिट्यूड दाखवला तर आपण लगेच बोलतो गेला उडत, तुझ्या सारखे लय पाहिलेत , काय गरज नाही तुझी.
मग देवाला का नाही म्हणत असं गेला उडत, काय गरज नाही तुझी, लय पाहिलेत तुझ्या सारखे. देव तर आपल्याला कधीच भेटत नाही, पण आपण करतो का कधी धाडस त्याला असं बोलण्याचं.का घाबरतो आपण त्याला येवढं काय माहीत.ना तो आपल्याला कधी भेटतो ,ना तो कधी आपल्या बरोबर बोलतो.आपण त्याला येवढं नारळ-बिरळ फोडतो, त्याला चांगला तुपाचा नैवेद्य देतो, पण तो साधा धन्यवाद सुद्धा म्हणत नाही आपल्याला. तो आपल्याला कवडीबद्दल सुद्धा विचारीत नाही.तरी आपण त्याच्या दारात कशाला काशी करायला जातो काय माहीत. पण आपण त्याला शिव्या कधीच देत नाही.त्याला वाईट कधीच बोलत नाही. त्याच्यावर आपण रुसत देखील नाही.खरं पहायला गेलं तर आपल्यातच दम नाही त्याला शिव्या द्यायला. त्याच्या बद्दल वाईट बोलायचं म्हटलं तर आपली तिथंच जाग्यावरच फाटते ,कशी , टररर......बरोबर ना. ज्याला स्वतःच्या जाग्यावरून उठता येत नाही, जो कुणासोबत बोलू शकत नाही, जो आपण त्याला दिलेला नैवेद्य सुध्दा खाऊ शकत नाही. ज्याला स्वतःच्या घरात चोरी झालेली सुद्धा कळत नाही. नदीला महापूर आल्यावर त्याला स्वतःला वाचवता येत नाही, त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना तो त्या महापूरापासून वाचवू शकत नाही. जो स्वतःच्या दारात उपाशी पोटी त्याच्या नावाने भीक मागणाऱ्यांना पोटभर खायला देऊ शकत नाही, ज्याच्या मंदिरात त्याच्या डोळ्यासमोर चार चार दिवस एखाद्या मुलीवर बलात्कार होतो. त्या मुलीला सुध्दा तो वाचवू शकत नाही. अशा कर्तव्य शून्य , कार्य शून्य देवाला आपण घाबरतो.
                      थोड्या थोडया गोष्टींवरून आपण आपल्या मित्रमैत्रिणीनां , नातेवाईकांना मतलबी म्हणतो. त्याच्या सारखं ,तिच्या सारखं,त्यांच्या सारखं मतलबी,स्वार्थी या दुनियेत शोधून सुद्धा कोणी सापडणार नाही असं आपण म्हणतो.पण देवाला कधीच आपण मतलबी म्हणत नाही. आपण त्याला कधीच स्वार्थी म्हणत नाही.असं का बरं. आपला देव स्वार्थी नाही का ? तो मतलबी नाही का ?
 तो फक्त आपल्याकडून घेतो, त्याच्या बदल्यात तो आपल्याला काहीच देत नाही.आपणच त्याला भेटायला जातो , तो कधीच येत नाही आपल्याला भेटायला.आपण त्याची आठवण आली की त्याच्या नावाचा जप करतो.पण त्याला येत असेल का आपली आठवण ? तो करत असेल का आपल्या नावाचा जप. मला तर पक्क माहीत आहे तो आपल्याला कुत्र्याबद्दल सुध्दा विचारत नाही. त्याच्या दारात सारखं सारखं जाऊन आपल्याला काही किंमतच राहिली नाही. आपण त्याच्या दारात गेल्यावर तो हसत असेल आपल्यावर , म्हणत असेल आली बावळाटं🤣😂😂.
                      साधंच उदाहरण घ्या कि.आपल्या घरातील एखादी व्यक्ती काम करत नसेल तर आपण त्याला जे नाही ते बोलतो. नुसताच आयतं खातोय असं म्हणतो. त्याला काय रोग आलाय काम करायला नुसतंच आयतं खातोय. फक्त एवढंच नाही तर त्याला ज्या शिव्या कधी कोणी ऐकल्या नसतील असल्या शिव्या देतो.पण आपण देवाला कधी असं काही बोलतो का ? देव करतो का कुठलं काम ? तरी आपण त्याला जाग्यावरच देतो ना सगळं. त्याला राहायला चांगलं भव्यदिव्य मंदिर बांधतो.त्या मंदिराला चांगलं सजवतो धजवतो. देवाचं कसं झालंय माहितेय का...तो बिनपगारी पण फुल अधिकारी झालाय.तो झालाय साहेब आणि आपण त्याचं सेवक. शिवाय तो अंगठा बहाद्दर.आपण तर त्याच्या पेक्षा जास्त शिकलेलो. आपण ग्रॅज्युएट आणि तो साधा बालवाडीत सुद्धा गेला नाही तरी  त्यो साहेब झालाय. तरी त्योच पावर मधी ! आपणच त्याच्याकडे जायचं, आपणच त्याच्या पाया पडायचं.आपण येवढ्या डिग्र्या घेऊन आपल्याला काही मानबीन हाय का नाय. देवाला विचारा बरं , देवा तुला माहितीय का अर्थशास्त्र  ? तुला माहितेय का भूगोल-बिगोल ? पर्यावरणशास्त्र , इतिहास, भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र, जीवशास्त्र यातलं काहीतरी माहीत आहे का ? डॉक्टर-इंजिनीअर ,वकिल-बिकिल असलं काही माहीत आहे का तुला ? माहित असेल तर सांग ? आणि माहीत असलंच तर कसकाय माहीत आहे ते पण सांग. कोणत्या शाळेत शिकला ते पण सांग.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर तुझी पदवी दाखव म्हणजे डिग्री दाखव. मला माहित आहे येवढे प्रश्न विचारल्यावर तु बोलणारच नाही. तसं पण तुला बोलता येतं नाही आणि एवढे प्रश्न विचारल्यावर तर तु बोलणारच नाही.
                          म्हणून आत्ताच सांगतो मित्रांनो सांगा त्या देवाला.बाबा आता लय झालं तुझं. आम्ही काय तुझ्या पुढपुढं करायला मोकळे नाही.तुला काय आम्ही आता आयतं देणार नाही. एका जाग्यावर बसून तु आळशी झाला आहेस.तुझं तु काम कर आणि खा. तुझ्या देवळाचं तूच राखण कर. आणि तुला जो एटिट्यूड आहे ना तो तुझ्याकडेच ठेव. आम्हाला तुझ्या बरोबर बोलायचंही नाही आणि तुझ्याकडे यायचंही नाही. तुला आमची गरज असेल तर तु ये आमच्याकडे. नाहीतर तुझी आम्हाला गरज नाही. तु आला तर आला नाहीतर गेलास उडत. तुझी काही गरज नाही आम्हाला. कळलं का!


वैभव चौधरी

Comments

Popular posts from this blog

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा तेवढंच देवाला पुण्य...     देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...