Skip to main content

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीडीपीच्या 5% वरून 7% वर गेला.2017 मध्ये तर ही टक्केवारी  7% ते 10% वर गेली. OECD  हा एक प्रगत राष्ट्रांचा गट आहे. त्यातला 36 प्रगत देशांमध्ये आरोग्यसेवा जवळपास मोफत किंवा खूप स्वस्त आहे.जेव्हा भारत सरकार आरोग्यसेवेवर 2015 -16 मध्ये दरडोई दरवर्षी 16 डॉलर्स खर्च करत होतं  तेव्हा अमेरिकन आणि ब्रिटिश सरकार हे दरडोई दरवर्षी 1112 रुपये किंवा अनुक्रमे 4802 आणि 3500 डॉलर्स खर्च करत होते! भारतातली ही रक्कम ही मोठ्या शहरातल्या  हॉस्पीटलमध्ये डॉक्टरच्या एका कन्सल्टेशनलाही पुरणार नाही.ही रक्कम म्हणजे दरमहा 93 रु.किंवा दररोज 3 रू.!यामुळे अर्थातच बहुतांशी लोकांना आरोग्यासाठी खाजगी डॉक्टर आणि हॉस्पिटल्स  यांच्याकडे जावं लागतं.पण हे न प्रवडल्यामुळे दरवर्षी 6.3 कोटी लोक दारिद्र्याच्या खाईत लोटले जातात. खाजगी डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्स न प्रवडल्यामुळे शहरातले 68% लोक आणि खेड्यातील 57% लोक डॉक्टरकडे न जाता स्वतःच्या मनानंच औषध घेतात आणि तीही परवडली नाहीत तर तीही घेत नाहीत.

आजचा_भारत
अनर्थ - विकासनीती : सर्वनाशच्या उंबरठ्यावर ?
अच्युत_गोडबोले
वैभव_चौधरी

Comments

Popular posts from this blog

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा तेवढंच देवाला पुण्य...     देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना ...

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...