अरे वा प्रज्ञाजी !! Bjp ने जनतेला 2014 मध्ये सांगितले देश काँग्रेस मुक्त करायचा आहे. पण हिने तर आता नथुराम गोडसे ला देशभक्त म्हणून दाखवून दिले की bjp ला देश काँग्रेस मुक्त नाही तर गांधी मुक्त करायचा आहे. त्यांना सर्व स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, त्याच्या विचारसरणीचा नाश करायचा आहे.वारंवार बोलले जाते की संघाचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग न्हवता आणि हे ऐतिहासिक सत्य आहे हे कोणी डावलू शकत नाही. त्यामुळे संघाला स्वातंत्र्य चळवळीची विचारसरणीच (नेहरु-गांधी) नष्ट करायची आहे.गोडसेनी कुठल्या दहशदवादीचा खून नाही केला . त्याने महात्मा गांधींच्या खून केला आहे. ज्या गांधीने स्वतः देशाचे नेतृत्व केलं अशा महान व्यक्तीचा खून केला. गांधींजींची देशभक्ती , हिंदुत्व भक्ती गोडसे पेक्षा कमी होती काय ? जे गांधी संपूर्ण हिंदू समाजाचे नेतृत्व करत होते त्यांची ह्या देशद्रोही नथुराम गोडसेनी हत्या केली. स्वतंत्र भारतातला नथुराम गोडसे हा पहिला हिंदू देशद्रोही होता. संपूर्ण देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड करत होता, देशासाठी स्वतःच जीवन पणाला लावून लढत होता आणि हा संघ परिवार हिं...