Skip to main content

देश भक्त कोण ! गांधी का गोडसे ? - वैभव चौधरी

अरे वा प्रज्ञाजी !!
Bjp ने जनतेला 2014 मध्ये सांगितले देश काँग्रेस मुक्त करायचा आहे. पण हिने तर आता नथुराम गोडसे ला देशभक्त म्हणून दाखवून दिले की bjp ला देश काँग्रेस मुक्त नाही तर
गांधी मुक्त करायचा आहे. त्यांना सर्व स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, त्याच्या विचारसरणीचा नाश करायचा आहे.वारंवार बोलले जाते की संघाचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग न्हवता आणि हे ऐतिहासिक सत्य आहे हे कोणी डावलू शकत नाही. त्यामुळे संघाला स्वातंत्र्य चळवळीची विचारसरणीच (नेहरु-गांधी) नष्ट करायची आहे.गोडसेनी कुठल्या दहशदवादीचा खून नाही केला . त्याने महात्मा गांधींच्या खून केला आहे. ज्या गांधीने स्वतः देशाचे नेतृत्व केलं अशा महान व्यक्तीचा खून केला. गांधींजींची देशभक्ती , हिंदुत्व भक्ती गोडसे पेक्षा कमी होती काय ? जे गांधी संपूर्ण हिंदू समाजाचे नेतृत्व करत होते त्यांची ह्या देशद्रोही नथुराम गोडसेनी हत्या केली.
स्वतंत्र भारतातला नथुराम गोडसे हा पहिला हिंदू देशद्रोही होता.
संपूर्ण देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड करत होता, देशासाठी स्वतःच जीवन पणाला लावून लढत होता आणि हा संघ परिवार हिंदू धर्माचे संघटनाचे काम करत होता. हि संघटना उभी करून संघाने  धर्माला माणसापेक्षा वर नेऊन बसवले. नथुराम गोडसे जर  भगतसिंग बरोबर देशासाठी फाशीवर चढला असता तर त्याला नक्कीच आम्ही देशभक्त मानला असता . पण हा तर देशद्रोही आहे. संघाने दाखवून द्यावे की संघ कुठल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होता .देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कुठल्या चळवळीत संघाची लोकं महात्मा गांधी बरोबर होती. संघाचा हा फालतू धार्मिकपणा खूप दिवस नाही टिकणार.
माणसाने स्वतःच्या जगण्यासाठी धर्माची निर्मिती केली पण या संघाने धर्मासाठी समाजात दंगली घडवल्या.
संघानं एक ध्यानात ठेवावं तुम्ही गांधीजींचे आणि नेहरूंचे विचार कधीच मारू शकत नाही.
गोडसे देशद्रोही होता , आजही आहे आणि तो उद्याही असणार आहे.तथाकथित काही संघभक्तांना अशा वेळेस संविधानाची आठवण येते.  संविधानात सांगितले खून करणारा तर आरोपी असतो ? मग तुम्ही त्याला देशद्रोही कसा म्हणता ? मग
विमानात रात्रीचा प्रवास करून देशाचा पैसे वाचवणारा देशभक्त कसा होतो ?  पान खाऊन बसमध्ये थुंकणारा देशद्रोही होतो.दहशतवाद्या बरोबर लढताना स्वतःचा जीव गमवणारे हेमंत करकरे देशद्रोही ठरतात तर गांधींना मारून गोडसे सच्चा देशभक्त कसकाय होतो ?
जय हो ..

जय भारत
वैभव चौधरी

Comments

Popular posts from this blog

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा तेवढंच देवाला पुण्य...     देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...