Skip to main content

''संघ हिंदू समाजाचे संघटन करतो. त्यामुळे संघ कोणाचाही विरोधक नाही.- एक समीक्षा

''संघ हिंदू समाजाचे संघटन करतो. त्यामुळे संघ कोणाचाही विरोधक नाही. उलट जे स्वत:ला संघाचे विरोधक समजतात, ते संघाचे प्रचारक असतात. संघाच्या प्रचारकापेक्षाही ते जास्त काम करतात. संघाचा सामान्य स्वयंसेवक असामान्य काम करतो, याचा विरोधक अनुभव घेत असतात. राष्ट्र प्रथम, समाज प्रथम ही भावना स्वयंसेवकांच्या मनात जागवण्याचे काम संघ करतो आणि ती वृत्ती होईल याकडे लक्ष संघ देतो. छत्रपती शिवरायांचे अधुरे स्वप्न, हिंदू समाजाचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा आणि भक्तिभाव जागवण्याचे काम संघ करतो.

#माझे_मत👇#आणि_काही_प्रश्न
       संघ कुणाचा विरोधक नाही मग संघटना कशासाठी उभी करत आहे.संघाला म्हणजे हिंदू धर्मियांना आता कशाची भिती आहे. का म्हणून संघटना उभी करत आहे, त्याची शाखा वाढवत आहे.

संघाचा स्वयंसेवक असामान्य काम करतो म्हणे -
असे कुठले काम फक्त संघाचा स्वयंसेवकच करतो इतर भारतीयांना ते जमत. असं कुठलं काम माझ्या अजून ऐकण्यात नाही. किंवा फक्त संघावालेच असामान्य आहे बाकीचे सगळे सामान्य आहेत . असं म्हणायचं आहे का संघाला.

राष्ट्र प्रथम, समाज प्रथम ही भावना स्वयंसेवकांच्या मनात जागवण्याचे काम संघ करतो आणि ती वृत्ती होईल याकडे लक्ष संघ देतो.
#संघ जर राष्ट्र प्रथम, समाज प्रथम ही भावना स्वयंसेवकांच्या मनात जागवण्याचे काम करतो आणि ती वृत्ती होईल याकडे लक्ष देतो म्हणे , मग राष्ट्र म्हणजे फक्त हिंदू धर्मीयांचेच राष्ट्र आहे का ? संघ समाज प्रथम ही भावना मनात जागवण्याचं काम करतो म्हणे, मग भारतीय समाज हा फक्त काय हिंदू धर्मियांचा आहे का. अजून इतर धर्मीय कोणी भारतात राहत नाही का ? समाजातील इतर धर्मीय लोकांना संघात का प्रवेश नाही.  किंवा इतर धर्मीय लोकांच्या मनात राष्ट्र प्रथम, समाज प्रथम ही भावना जागवण्याची गरज नाही का ? किंवा इतर धर्मीय लोकांच्या मनामध्ये ही भावना आधीपासूनच आहे त्यामुळे संघात त्यांना प्रवेश नाही.
हिंदू धर्मीय लोकांमंध्ये ह्या भावनेचा अभाव आहे म्हणून संघ फक्त हिंदू धर्मीय लोकांचीच  संघटना बांधत आहे का  ?

छत्रपती शिवरायांचे अधुरे स्वप्न, हिंदू समाजाचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा आणि भक्तिभाव जागवण्याचे काम संघ करतो. -
#किती दिवस अजून शिवाजी महाराजांच्या जीवावरच चालवणार आहात तुमचं धोतांड. आजच्या काळात भारतात हिंदू समाजाचे साम्राज्य का निर्माण करायच आहे संघाला ? व कशासाठी ? 21व्या शतकाची अशा कुठल्या साम्राज्याची गरज नाही. आणि मुळात साम्राज्य ह्या शब्दाचा वापर करण्याची आता गरज नाही. साम्राज्य हा शब्द इतिहासकालीन झाला. हा शब्द वापरून समाजाची दिशाभूल करण्याची काय गरज नाही. ही गरज का पडली संघाला . आता भारतावर  राज्यकर्ते हे स्वत भारतीय आहेत. भारत हा एक स्वतंत्र देश आहे. आणि या देशामंध्ये आता कोनी गुलाम नाही सगळे स्वतंत्र आहेत. भारत हा आता कुठल्या राजेशाहीच्या सांगण्याने चालत नाही . भारताची स्वतःची घटना आहे,कायदा आहे. भारत आता संविधानाने दाखवलेल्या दिशेने , सांगितलेल्या मार्गांनी चालवला जातो . त्यामुळे हिंदू धर्मीय साम्राज्य स्थापना करायची असं म्हणण्याची किंवा असा वाक्य प्रयोगही करण्याची गरज नाही.
संविधानाने सर्व धर्मांना, धार्मिक परंपरांना संरक्षण दिले आहे. भारतीय कायद्या समोर आता सर्व धर्मीय समान आहेत . म्हणजेच सर्व भारतीय आहेत.
संघ म्हणतो की शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण संघाला येवढं कळत नाही का शिवाजी महाराजांचे हे स्वप्न 17व्या शतकातील होतं . 21 व्या शतकातील न्हवतं.17 व्या शतकात भारतावर मुघलांचं राज्य होतं आणि ते मोघल मुस्लिम धर्मीय होते. सर्व भारतीय म्हणजे त्यावेळेचे हिंदूंनी एकत्र येऊन मोगल राजवटी विरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करावं किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी म्हणून शिवाजी महाराजांनी हे स्वप्न मनाशी बाळगले होते. पण आता 21व्या शतकामंध्ये फक्त हिंदू साम्राज्याची स्थापना करायची गरज नाही.
17 व्या शतकातील समस्या वेगळ्या होत्या .
21व्या शतकातील समस्या वेगळ्या आहेत.
21 व्या शतकामध्ये भारतामध्ये उभ्या राहिलेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी सर्वांनी कार्य केल पाहिजे.
आता भारतामध्ये कुठला धर्म संकटात नाही.
संकटात आहे युवकांच भविष्य.
संकटात आहे स्त्रियांचं जीवन .
भारतामध्ये बेरोजगारीची समस्या वाढली आहे त्यामुळे गुन्हेगारी वाढत झाली आहे. 
ह्या सर्व समस्यांना बाजूला सारून संघ कुठल्या साम्राज्याबाबत बोलत आहे.
आता आपण सर्व भारतीय आहोत , सर्वांना कायद्याने समान अधिकार दिले आहेत . कुणाचाच जीव संकटात नाही , ज्याचा कुणाचा असेल तर त्याला संरक्षण देण्यासाठी पोलीस आहेत. त्यामुळे कुठली संघटना उभी करून तिला धर्म रक्षणासाठी प्रशिक्षण देण्याची गरज नाही . महत्वाचे म्हणजे धर्म हा माणसांसाठी आहे , माणूस धर्मासाठी नाही. पण आपण भारतीय लोकांनी आपलं सर्व जीवनच धर्म कार्यात लावून जीवन वाया घालवलं. धर्म हा परिवर्तनीय असतो. जो काळानुसार स्वतःत बदल करत नाही तो धर्म नसतो.

#जय_भारत
#वैभव_चौधरी

Comments

Popular posts from this blog

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा तेवढंच देवाला पुण्य...     देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना ...

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...