Skip to main content

भारतातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती !

2016 - 17 मध्ये आपल्या शाळांची काय परिस्थिती होती ? हे वाचून आपल्याला धक्काच बसेल.42% शाळांना कुंपण (कंपौंड) न्हवतं, 45% शाळांमध्ये हेडमास्तरांना वेगळी खोलीही न्हवती, 40% शाळांमध्ये ग्रंथपाल (लायब्रेरीयन) न्हवता,40% शाळांमध्ये वीज न्हवती, 18% शाळांमध्ये खेळण्यासाठी मैदान न्हवतं,72% शाळांमध्ये कॉम्प्युटर न्हवता.13% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था व्यवस्थित न्हवती. खेड्यातल्या आणि शहरातल्या एकूण सरासरी 47% शाळांमध्ये शौचालय किंवा वॉशबेसीन यांची तरतूद न्हवती! आणि 44% शाळांमध्ये मुलींकरता वेगळं टॉयलेट न्हवतं! तर 5 वीतल्या 52% मुलांना दुसरीसाठीचं पाठ्यपुस्तक वाचताही येत न्हवतं आणि 49% मुलांना दोन अंकीची वजाबाकी जी दुसरीत करायला शिकवतात, तीही करता येत न्हवती ! हे सगळं आपल्याला http:/www.dise.in या वेबसाईटवर वाचायला मिळतं.
आहे का नाही भयानक परिस्थिती.अशा परिस्थिती आपण महासत्ता कसे होऊ शकतो हा एक गंभीर प्रश्नच आहे.असो...

आजचा_भारत
अनर्थ - विकासनीती : सर्वनाशच्या उंबरठ्यावर ?
अच्युत_गोडबोले
वैभव_चौधरी

Comments

Popular posts from this blog

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...