Skip to main content

Posts

लालपरीची आठवण😍

Recent posts

डरना जरूरी हैं!

डरना जरूरी हैं! अगर आपको खुद को बदलने के लिए खुद के बनाये हुये रास्तो सें अकेला चलना पड़ रहा हों। और अगर इस अकेले पन सें आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर आप समाज का धर्म और जाती के नाम पर हो रहा हुआ विभाजन रोकना चाहते हों। और अगर इस विचारोंके चलते आपको धर्म और जाती क़े ठेकेदारोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। अगर देश कि सत्ताधारी पॉलिटिकल पार्टियां, देश कि फौज और उनकी कर्तबगारी को अपना पॉलिटिकल एजेंडा बना रही हों। अगर आप इसके खिलाफ आवाज उठाने जा रहें हो। और इसके कारण आपको इन पॉलिटिकल पार्टियोंसे डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी हैं। देश में विकास के नाम पर कामगारों और गरीबोंका हो रहा हुवा शोषण रोकने के लिए, आपको यहां कि सत्तासे और ठेकेदारोंसे लढना पड़ रहा हैं। और अगर इसके कारण इनसे आपको डर लग रहा हों। तो आपको डरना जरूरी है। अगर देश कि मिडिया अपने कर्म के धर्म को छोड़कर, सत्ताधारियोंका गुनगान गाने में व्यस्त हैं। अगर इस परिस्थितियों के चलते कारण आपको यह एहसास हो रहा हैं कि देश में रहने वालें पीड़ितोंकि, गरीबोंकि, अन्याय से लढने ...

शहरातील शिकलेल्या माणसापेक्षा जंगलात राहणार आदिवासी माणूस जास्त सुसंस्कृत ,प्रगल्भ आणि समजूतदार आहे- वैभव चौधरी

शहरातील शिकलेल्या माणसापेक्षा जंगलात राहणार आदिवासी माणूस जास्त सुसंस्कृत ,प्रगल्भ आणि समजूतदार आहे- वैभव चौधरी                     वाईज अँड अदरवाईज हे सुधा मूर्ती यांचं पुस्तक वाचत होतो.या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या अनुभवांचं कथन आहे. या अनुभवकथनातील प्रत्येक लेख हा विचार करायला लावणारा आहे. याच पुस्तकातील ६ वा लेख आहे म्हताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा.                       या लेखातील काही भाग मी इथे आपणाला वाचण्यासाठी देत आहे.या लेखात सुधा मूर्ती आणि त्या म्हताऱ्या माणसांमध्ये झालेला सवांद अंतर्मुख करणारा आहे. विचार मग्न करायला लावणारा आहे.ज्या प्रकारे त्या माणसाच्या बोलण्यानं सुधा मूर्ती विचार मग्न झाल्या त्याच प्रकारे वाचक ही विचार मग्न होतो. सुधा मूर्ती ह्या ओडीसा राज्यातील आदिवासी भागातील एका खेड्यात भेट द्यायला जातात तेव्हा त्यांची त्या गावातील एका म्हाताऱ्याशी भेट होते. त्यांच्यात झालेल्या संवादातून असं कळतं कि भारत देश स्वतंत्र झाला आहे हे भार...

देवावर रुसा रे कधीतरी !!

देवावर रुसा रे कधीतरी !!  देवावर रागवा रे कधीतरी !!  देवावर ओरडा रे कधीतरी !! तो येतो का कधी धावून आपल्या मदतीला. एखाद्या मित्राने आपली मदत नाही केली कि त्याच्यावर रुसून ,रागावून, त्याला वाकडं-तिकडं बोलून पार शिव्या देऊन मोकळं होणारे आपण. देवावर रागावतो का कधी ? देवावर रुसतो का कधी ? देतो का कधी शिव्या देवाला?. आपण मित्रांसोबत फक्त एवढंच करत नाही. आपण त्यांच्या बरोबर बोलायचं पण सोडतो. पण आपण देवा बरोबर असं वागतो का कधी! आपण देवाला शिव्या देतो का कधी ! तो तर कधीच आपल्या मदतीला धावून येत नाही, तो आपल्याला कधी भेटायला सुद्धा येत नाही. आपणच जातो झकमारुन त्याला भेटायला त्याच्या दारात! म्हणजे बघा ना किती एटिट्यूड आहे देवाला. इथं आपण आपल्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने आपल्याला एटिट्यूड दाखवला तर आपण लगेच बोलतो गेला उडत, तुझ्या सारखे लय पाहिलेत , काय गरज नाही तुझी. मग देवाला का नाही म्हणत असं गेला उडत, काय गरज नाही तुझी, लय पाहिलेत तुझ्या सारखे. देव तर आपल्याला कधीच भेटत नाही, पण आपण करतो का कधी धाडस त्याला असं बोलण्याचं.का घाबरतो आपण त्याला येवढं काय माहीत.ना...

देव कधीच येत नसतो कामाला!!!!!

अशा वेळी देव कामा येत नसतील तर तर देवळातल्या दानपेट्या कामी लावा तेवढंच देवाला पुण्य...     देव फक्त पूजण्याकरताच कामाचा आहे का ? आपण त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची, मोठमोठ्या आरत्या म्हणायच्या कशासाठी ? तूच सुख करता तूच दुःख हरता असं म्ह्णून मानसिक समाधान मिळवायचं का आणि कशासाठी? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून मानसिक समाधान मानायचं! का ? आला का तो धावून तुमच्या मदतीला ? ज्या पोरांना टुकार-टकार म्हणून हिणवले गेलं तीच पोरं आज मदतीला धावून आल्यात. कुठल्या ब्राह्मण पुरोहित वर्गाने माणसं वाचावीत म्हणून काही हालचाली केल्या आहेत का ? केलंय का कोणी धाडस असं म्हणायला कि मदतीला देव धावून नाही आला पण त्याच्या तिजोर्यांचाच देवाच्या रूपानं वापर करा ! आज माणसंच माणसाच्या कामाला आली. बाबाहो आता तरी सुधरा , कुठल्या बुवा- बाबा च्या नादी लागू नका. कुठल्याच बुवाला- बाबाला भविष्य पाहता येत नाही आणि कुठलाच बुवा- बाबा तुमचं भविष्य बदलुही शकत नाही आणि ते घडवुही शकत नाही. तुमचं भविष्य बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तमानात कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा फालतूपणा सोडा. ज्यांना ...

ज़िंदगी...

ए इंसान तू मत भाग उन चिजोंके पीछे, जो तुझे दूरसे आकर्षित करती हैं। तु बस इस वक्त जो तेरे पास हैं, उन्हें अपने सच्चे दिल से जीत ले। क्योंकि यहीं चीजे तेरी ज़िंदगी सुख, शांती और खुशियोंसे भर देंगी। तु बस इन चिजोंके सहारेसे, तू इस वक्त को जीना सिख लें। जिस दिन इन चिजोंके सहारेसे तू इस वक्त को जीना सीख लेगा, उसी दिन ए वक्त तुझे सिखाएंगा, कि ज़िंदगी क्या हैं। और तु इस ज़िंदगी के खेल को समझ जाएगा। तभी तू जानेगा , कि यही ज़िंदगी हैं। - वैभव चौधरी - 20/1/2017

भारतातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती !

2016 - 17 मध्ये आपल्या शाळांची काय परिस्थिती होती ? हे वाचून आपल्याला धक्काच बसेल.42% शाळांना कुंपण (कंपौंड) न्हवतं, 45% शाळांमध्ये हेडमास्तरांना वेगळी खोलीही न्हवती, 40% शाळांमध्ये ग्रंथपाल (लायब्रेरीयन) न्हवता,40% शाळांमध्ये वीज न्हवती, 18% शाळांमध्ये खेळण्यासाठी मैदान न्हवतं,72% शाळांमध्ये कॉम्प्युटर न्हवता.13% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था व्यवस्थित न्हवती. खेड्यातल्या आणि शहरातल्या एकूण सरासरी 47% शाळांमध्ये शौचालय किंवा वॉशबेसीन यांची तरतूद न्हवती! आणि 44% शाळांमध्ये मुलींकरता वेगळं टॉयलेट न्हवतं! तर 5 वीतल्या 52% मुलांना दुसरीसाठीचं पाठ्यपुस्तक वाचताही येत न्हवतं आणि 49% मुलांना दोन अंकीची वजाबाकी जी दुसरीत करायला शिकवतात, तीही करता येत न्हवती ! हे सगळं आपल्याला http:/www.dise.in या वेबसाईटवर वाचायला मिळतं. आहे का नाही भयानक परिस्थिती.अशा परिस्थिती आपण महासत्ता कसे होऊ शकतो हा एक गंभीर प्रश्नच आहे.असो... आजचा_भारत अनर्थ - विकासनीती : सर्वनाशच्या उंबरठ्यावर ? अच्युत_गोडबोले वैभव_चौधरी

भारताचं आरोग्यच आय. सी. यू.मध्ये आहे !

एकंदरीत आरोग्यावर आपलं सरकार अतिशय कमी खर्च करतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यसेवेवर राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) कमीतकमी 5% खर्च केले पाहिजेत,असं सांगितले असताना आपण यावर खूपच कमी खर्च करत आलोय.1985 साली भारत सरकार (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या फक्त 1.3% आरोग्यवर खर्च करत होतं.पण धक्का देणारी बाब म्हणजे भारत सरकारनं  1991 सालापासून जागतिकीकरणानंतर निऑलिबरल धोरण स्वीकारल्यानंतर , एकूणच शिक्षण आणि आरोग्य यांच्या सारख्या सामाजिक हिताच्या कल्याणकारी गोष्टींवरचा खर्च कमी केला.त्यामुळे 2004-05 मध्ये आरोग्यसेवेवरच्या खर्चाच हे प्रमाण जीडीपीच्या 0.75% पर्यंत घसरलं! 11 व्या पंचवार्षिक  योजनेत हा खर्च जीडीपीच्या 3% पर्यंत आणण्याचं आश्वासन भारत सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र केंद्र आणि राज्य शासन मिळून आरोग्यावर जीडीपीच्या फक्त 1.29% एवढाच खर्च भारत सरकारने केला.2018 साली तर ही टक्केवारी कमीच झाली आहे.शिवाय भ्रष्टाचारामूळे यातले 0.5% तरी तरी लोकांपर्यंत पोहचत असतील का नाही, याविषयी शंकाच आहे.याउलट 27 प्रगत राष्ट्रांचा आरोग्यवरचा खर्च 1990 ते 2008 च्या दरम्यान जीड...

देश भक्त कोण ! गांधी का गोडसे ? - वैभव चौधरी

अरे वा प्रज्ञाजी !! Bjp ने जनतेला 2014 मध्ये सांगितले देश काँग्रेस मुक्त करायचा आहे. पण हिने तर आता नथुराम गोडसे ला देशभक्त म्हणून दाखवून दिले की bjp ला देश काँग्रेस मुक्त नाही तर गांधी मुक्त करायचा आहे. त्यांना सर्व स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, त्याच्या विचारसरणीचा नाश करायचा आहे.वारंवार बोलले जाते की संघाचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग न्हवता आणि हे ऐतिहासिक सत्य आहे हे कोणी डावलू शकत नाही. त्यामुळे संघाला स्वातंत्र्य चळवळीची विचारसरणीच (नेहरु-गांधी) नष्ट करायची आहे.गोडसेनी कुठल्या दहशदवादीचा खून नाही केला . त्याने महात्मा गांधींच्या खून केला आहे. ज्या गांधीने स्वतः देशाचे नेतृत्व केलं अशा महान व्यक्तीचा खून केला. गांधींजींची देशभक्ती , हिंदुत्व भक्ती गोडसे पेक्षा कमी होती काय ? जे गांधी संपूर्ण हिंदू समाजाचे नेतृत्व करत होते त्यांची ह्या देशद्रोही नथुराम गोडसेनी हत्या केली. स्वतंत्र भारतातला नथुराम गोडसे हा पहिला हिंदू देशद्रोही होता. संपूर्ण देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड करत होता, देशासाठी स्वतःच जीवन पणाला लावून लढत होता आणि हा संघ परिवार हिं...

''संघ हिंदू समाजाचे संघटन करतो. त्यामुळे संघ कोणाचाही विरोधक नाही.- एक समीक्षा

''संघ हिंदू समाजाचे संघटन करतो. त्यामुळे संघ कोणाचाही विरोधक नाही. उलट जे स्वत:ला संघाचे विरोधक समजतात, ते संघाचे प्रचारक असतात. संघाच्या प्रचारकापेक्षाही ते जास्त काम करतात. संघाचा सामान्य स्वयंसेवक असामान्य काम करतो, याचा विरोधक अनुभव घेत असतात. राष्ट्र प्रथम, समाज प्रथम ही भावना स्वयंसेवकांच्या मनात जागवण्याचे काम संघ करतो आणि ती वृत्ती होईल याकडे लक्ष संघ देतो. छत्रपती शिवरायांचे अधुरे स्वप्न, हिंदू समाजाचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा आणि भक्तिभाव जागवण्याचे काम संघ करतो. #माझे_मत👇#आणि_काही_प्रश्न        संघ कुणाचा विरोधक नाही मग संघटना कशासाठी उभी करत आहे.संघाला म्हणजे हिंदू धर्मियांना आता कशाची भिती आहे. का म्हणून संघटना उभी करत आहे, त्याची शाखा वाढवत आहे. संघाचा स्वयंसेवक असामान्य काम करतो म्हणे - असे कुठले काम फक्त संघाचा स्वयंसेवकच करतो इतर भारतीयांना ते जमत. असं कुठलं काम माझ्या अजून ऐकण्यात नाही. किंवा फक्त संघावालेच असामान्य आहे बाकीचे सगळे सामान्य आहेत . असं म्हणायचं आहे का संघाला. राष्ट्र प्रथम, समाज प्रथम ही भावना स्वयंसेवकांच्या मनात ...

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...

काँग्रेसच्या आणि देशाच्या अधोगतीला काँगेसची घराणेशाहीच कारणीभुत. - वैभव चौधरी

   एके काळी जनमाणसांची प्रतिमा असलेली काँग्रेस आज धुळीळा का मिळाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर एक अतिशय महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे काँग्रेसमध्ये असणारी घराणेशाही पद्धत. हि घराणेशाही पद्धत अगोदर अस्तित्वात न्हवती. लाल बहादूर शास्त्री यांच्या पर्यंत काँग्रेस पक्ष हा लोकशाही आणि विकेंद्रित असलेला पक्ष होता. पण 1966 नंतर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मित मृत्यू नंतर काँग्रेसला वेगळेच वळण लागले होते. जो काँग्रेस पक्ष 1966 पर्यंत म्हणजे भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूपर्यंत लोकशाही व विकेंद्रित होता, तोच पक्ष लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू नंतर लोकशाही व विकेंद्रित न राहता तो व्यवहारात एका व्यक्ती भोवती फिरणारा पक्ष बनला. 1969 मध्ये  काँग्रेस पक्षामध्ये चमचेगिरी करणाऱ्यांचा उदय झाला. साधारणपणे 1969 पर्यंत काँग्रेस हा पक्ष लोकशाही पक्ष होता. स्वातंत्र्य आंदोलनातील महान नेते गोखले, टिळक , बोस, गांधी आणि इतर या सर्वांचेच निष्ठावान अनुयायी होते. मात्र जाहीरपणे त्यांनी खुशमस्करेगिरीचे प्रदर्शन नाही केले नाही. जवाहरलाल नेहरूंनी...